उत्तर महाराष्ट्र

नाशिक : दाखल्यांसाठी ‘फर्स्ट कम, फर्स्ट आउट’; एजंटगिरीला बसणार चाप

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शैक्षणिक दाखले वितरणासाठी शासनाने 'फिको' प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली 'फर्स्ट कम, फर्स्ट आउट' असणार आहे. त्यामुळे दाखल्यांसाठीची वशिलेबाजी तसेच एंजटगिरीला चाप बसणार आहे.

महसूल विभागामार्फत आपले सरकार सेवा केंद्र व सेतू कार्यालयांमार्फत जनतेला व विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण करण्यात येते. दरवर्षी एप्रिल ते जुलै या कालावधीत दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांना शासनाच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. बहुतांश वेळा दाखल्यांसाठी नागरिक एंजट्सला हजारो रुपये मोजतात. तरीही वेळेत दाखला हाती मिळेल, याची शाश्वती नसते. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी शासनाकडून 'फिफो' फर्स्ट कम फर्स्ट आउट प्रणालीवर काम सुरू आहे. सिस्टीममध्ये त्यादृष्टीने बदल करण्यात येत असून लवकरच ही प्रणाली जिल्ह्यात कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना वेळेत दाखले उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे.

अशी आहे फिफो प्रणाली

फिको प्रणालीमध्ये दाखले हे त्यांच्या दाखल केलेल्या क्रमांकानुसारच स्वाक्षरी होईल. उदाहरणार्थ फिको प्रणालीमुळे एखाद्याने प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्याचा क्रमांक जर दहावा असेल, तर संबंधिताचा दाखला मंजूर करण्यासाठी अगोदरचे एक ते नऊ सर्व दाखले स्वाक्षरी होणे गरजेचे आहे. त्यानंतर दहाव्या क्रमांकाच्या दाखल्यावर अधिकाऱ्यांना स्वाक्षरी करता येईल. त्यामुळे दाखले प्रलंबित राहण्याचे प्रमाण कमी होण्यासोबत तहसील व प्रांत कार्यालयातील एंजटगिरीला चाप बसणार आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT