उत्तर महाराष्ट्र

नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

अंजली राऊत

नाशिक (चापडगाव) : पुढारी वृत्तसेवा
बिबट्याच्या हल्ल्यात शेतातील ज्वारीला पाणी भरायला गेलेला शेतकरी जखमी झाल्याची घटना चापडगाव येथे घटली.
चापडगाव – धुळवड फाटा येथे लक्ष्मण देवराव उघडे यांचा मुलगा घमा लक्ष्मण उघडे हा सकाळी आपल्या शेतात ज्वारीला पाणी भरण्यासाठी गेला होता. ज्वारीला पाणी सुरू असताना पाणी कुठपर्यंत केले आहे हे शेतात पाहण्यासाठी गेले असता अचानक बिबट्याने घमा याच्यावर हल्ला केला. घमा याच्यावर दोन्ही हातांना पंजा मारला यावर तेथे असलेल्या घमा यांच्या पत्नीने आरडाओरडा केला असता बिबट्या तेथून पळून गेला. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात घमा उघडे हे जखमी झाले. जखमी घमा उघडे यांना सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पत्नीने प्रसंगावधान राखत आरडाओरडा केल्याने पती घमा याचे प्राण वाचल्याने ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू होती.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT