उत्तर महाराष्ट्र

नाशिक : बनावट झंडू बाम, आयोडेक्स विकणार्‍यास बेड्या

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

बनावट झंडू बाम आणि आयोडेक्सचा माल विक्री करण्यासाठी चोपडा तालुक्यातील अडावद येथे आलेल्या एकाला अन्न औषध प्रशासन विभाग आणि अडावद पोलिस यांच्या संयुक्त पथकाने अटक केली. मनीष बजाज (वय 45, जळगाव) असे संशयित आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून 20 हजार 200 रुपयांचे बनावट औषध जप्त करण्यात आले. औषध निरीक्षक सहायक आयुक्त डॉ. अनिल माणिकराव आणि स्थानिक पोलिसांना याबाबत कळवले. मनीष बजाजच्या ताब्यातून पथकाने इमामी कंपनीच्या झंडू बामचे 250 बाटल्या, तर मॅक्सन हेल्थकेअरच्या आयोडेक्सचे 230 नग, असा सुमारे 21 हजार रुपयांचा किमतीचा माल मिळून आला. या प्रकरणी डॉ. अनिल माणिकराव यांच्या फिर्यादीवरून मनीष बजाजविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT