नाशिक महानगरपालिका www.pudhari.news  
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : मनपातील आर्थिक अपहारावर रोजच्या जमाखर्चाचा उतारा

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोड विभागीय कार्यालयानंतर पंचवटी विभागीय कार्यालयांतही आर्थिक अपहार झाल्याचे समोर आल्यामुळे मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सहाही विभागीय अधिकार्‍यांची बैठक घेत झाडाझडती घेतली. आर्थिक अपहाराच्या घटना पुन्हा घडू नयेत, याकरता विभागीय कार्यालयातील जमाखर्चाचा आता रोजच्या रोज आढावा घेतला जाणार आहे. तसेच पुन्हा अपहाराचे प्रकार घडल्यास अधिकार्‍यांवर कारवाईचा इशारा दिला.

महापालिका मुख्यालयासह सहाही विभागीय कार्यालयांमध्ये घरपट्टी, पाणीपट्टी तसेच विविध प्रकारच्या सेवांच्या बदल्यात नागरिकांकडून शुल्क स्वीकारले जाते. संबंधित नागरिकांनी कर तसेच शुल्काचा भरणा केल्यानंतर त्यांना मनपाकडून शुल्क अदा झाल्याची पावती दिली जाते. त्याची नोंद नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून करण्यात येते. हे कामकाज संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून होत असल्याने सुरक्षा म्हणून संगणकीय पासवर्ड केवळ विभागीय अधिकारी आणि संबंधित कामकाज करणार्‍या कर्मचार्‍यालाच माहित असतो. कर भरणा केल्यानंतर संबंधित व्यक्तीला पावती देऊन त्याची नोंद लगेचच संगणकात केली जाणे आवश्यक आहे. परंतु, नाशिकरोड आणि पंचवटीत झालेल्या घटनेबाबत लेखा परीक्षण विभागाने केलेल्या तपासणीत पंचवटी विभागात रस्ता तोडफोड शुल्क आणि नळकनेक्शन देण्याबाबत जमा झालेल्या रकमेच्या बनावट पावत्या आढळून आल्या आहेत. या रकमेची नोंद संगणकात झाली नसल्याचे समोर आले असून, सुमारे 50 लाखांचा अपहार झाल्याची शक्यता आहे. पंचवटी आणि त्याआधी नाशिकरोड अशा दोन विभागीय कार्यालयांमधील लागोपाठ अपहाराच्या घटना घडल्याने आयुक्तांच्या आदेशानुसार प्रशासन उपआयुक्त डॉ. मनोज घोडे-पाटील यांनी पंचवटी, नाशिकरोड, सातपूर, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व व सिडको विभागीय अधिकार्‍यांची बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला. तसेच दररोज होणार्‍या जमाखर्चाचा दररोज आढावा घेण्याचेही निर्देश देण्यात आले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT