नाशिक : कॅनडा कॉर्नर येथे एकाने तरुणीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेने सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशयित प्रणिल बाळू शिंदे (रा. शरणपूर रोड) याच्याविरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे.
पीडितेच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि.२०) रात्री दहा वाजता आईस्क्रिम देण्याच्या बहाण्याने विनयभंग केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस तपास करीत आहेत.
नाशिकरोड परिसरात वाहनातून चोरट्याने सोन्याचे दागिने व रोकड असा एक लाख २४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी अभिजीत अशोक सोमया (३४, रा. वजिराबाद, जि. नांदेड) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे. चोरट्याने शुक्रवारी (दि.२१) सकाळी साडे सहाच्या सुमारास ही चोरी केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा :