उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime : येवला रस्ता लुटीतील पाच संशयित गुजरातमध्ये जेरबंद

गणेश सोनवणे

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा
कांदा व्यापार्‍याचा कॅशियर आणि त्याचा सहकारी साडेसात लाख रुपयांची रक्कम घेऊन जात असताना येवला-अंदरसूल रस्त्यावर रक्कम लुटीच्या प्रयत्नात दुचाकी घसरून एका कर्मचार्‍याचा मृत्यू झाला होता. या अयशस्वी लुटीतील पाच संशयितांना पोलिसांनी तब्बल महिनाभरानंतर गुजरातमधून जेरबंद केले. येवला न्यायालयाने त्यांना 30 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी दिली.

सुनील अट्टल यांच्या आडत दुकानांमध्ये काम करणारे कॅशियर विजय नानासाहेब गायकवाड व राहुल उगले 21 जुलैला येवल्यातील कोपरगाव पीपल्स बँकेतून व्यापार्‍याची साडेसात लाख रुपये रक्कम अंदरसूलला घेऊन चालले होते. त्याचवेळी मोटरसायकलवर आलेल्या दोघा लुटारूंनी त्यांच्याकडील ही रक्कम हिसकवण्याचा प्रयत्न केला होता. या झटापटीमध्ये विजय गायकवाड यांची मोटारसायकल घसरून अपघात झाला. अपघात झाल्यानंतर चोरटे पळून गेले. मात्र, या अपघातात विजय गायकवाड याच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा मृत्यू झाला व त्याचा जोडीदार राहुल उगले हा गंभीर जखमी होता. दरम्यान, अपघातस्थळी लूट करणार्‍या गँगमधील आणखी एका मोटरसायकलवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्याकडील रकमेची पिशवी समजून डबा व कागदपत्रे असलेली पिशवी घेऊन पळ काढला होता. परंतु अपघातग्रस्त मोटरसायकलच्या डिकीमधील 7.5 लाख रुपयांची रक्कम सुरक्षित होती.

येवला शहर पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल लोकेशनची तांत्रिक माहिती घेतली. या लुटीतील संशयित हे अहमदाबादेतील असल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT