नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
इंदिरा नगर व पाथर्डी फाटा परिसरात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. पाथर्डी फाटा येथील फाळके स्मारकाजवळ हॉटेल अंगण समोर अज्ञात गुंडांनी कंपनीतून घराकडे जाणाऱ्या योगेश मोगरे यांची गाडी आडवून त्यांच्यावर धारदार कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.
यात योगेश मोगरे (वय ३९, रा. कालीबेरी सोसायटी इंदिरानगर) हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी मोगरे यांना पाथर्डी फाटा येथील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल केले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त तसेच इंदिरानगर पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास चक्रे सुरू केली आहे.
हेही वाचा :