नाशिक : म्हशी चोरल्याच्या संशयावरून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दोघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर बाबुराव पाळदे (३२, रा. लहवित गाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्याकडील जाफर जातीच्या दोन म्हशी ८ नोव्हेंबरला रात्री दहाच्या सुमारास चोरीस गेल्या. या म्हशी संशयित दादा काळू चव्हाण व संदीप उर्फ दिलीप दादा चव्हाण (दोघे रा. सामनगाव रोड) यांनी चोरल्याचा आरोप पाळदे यांनी केला आहे.
संशयितांनी चोरलेल्या दोनपैकी एक म्हैस विलास मुठाळ यांना विकल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल असून पोलिस तपास करीत आहेत.