उत्तर महाराष्ट्र

नाशिक : मुले पळवणारी टोळी समजून ब्लँकेट विक्रेत्यांना बेदम मारहाण

गणेश सोनवणे

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा

पोरधरी समजून दोन ब्लॅंकेट विक्रेत्यांना टाकळीरोडवर मारहाण झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. उपनगर पोलिसांनी या दोघांची चौकशी केली असता ते खरोखरच ब्लॅंकेट विक्रेते असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिस व नागरिकांनी दिलेली माहिती अशी की, टाकळी परिसरात किरकोळ विक्रेते व्यवसायासाठी फिरत असतात. काल दुपारी ब्लॅकेट विकणारे दोघे ब्लॅंकेट विक्रीसाठी आले होते. टाकळीरोडवरील एका नागरिकाच्या लहान मुलाने या विक्रेत्यांचे ब्लॅंकेट ओढले असता त्यातून वाद झाला. त्यातून हे दोघे विक्रेते मुले पळवणारी टोळीचे सदस्य असल्याचा गैरसमज नागरिकांचा झाला. विक्रेत्यांनी आपण नेहमी ब्लॅंकेट विक्री करत असतो हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तथापी, बालकांना पळवून त्यांच्या शरीराचे अवयव काढले जातात, बालकांना भिकेला लावले जाते, असे व्हिडीओ सोशल मिडीयावर, टिव्हीवर व्हायराल होत असतात. हे दोघे ब्लॅंकेट विक्रेते मुले पळविणारी टोळी असल्याचे समजून नागरिकांनी त्यांना बेदम मारहाण केली.

नागरिकांनी उपनगर पोलिसांना कळवले असता पोलिस तातडीने तेथे दाखल झाले. त्यांनी ब्लॅंकेट विक्रेत्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली. चौकशीत हे दोघे ब्लॅंकेट विक्रेते हे गुन्हेगार नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना सोडून देण्यात आले. उपनगर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता गैरसमजातून ही मारहाण झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक निलेश माईनकर यांनी दिली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT