पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते अद्वय हिरे यांनी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्षप्रवेश केला. ५० गद्दार भाजपसोबत गेल्यापासून भाजपला आमची गरज उरली नाही, असे ते पक्षप्रवेश करताना अद्वय हिरे म्हणाले. अद्वय हिरे नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणार असल्याचे शिवसेनेत प्रवेश करतेवेळी हिरे म्हणाले.