नाशिक (देवळा) : येथील जाणीव ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी संस्थापक भाऊसाहेब निंबा पगार यांची तर व्हा. चेअरमन पदी लक्ष्मीकांत शांताराम आहेर यांची अविरोध निवड करण्यात आली. या पतसंस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक गेल्या महिन्यात बिनविरोध पार पडली. आज शुक्रवारी (दि. ६) रोजी दुपारी १२ वाजता नवीन पदाधिकारी निवडीसाठी सहकार तथा निवडणूक निर्णय अधिकारी वसंत गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्वानुमते चेअरमन पदी संस्थापक भाऊसाहेब पगार यांची तर व्हा. चेअरमन पदी लक्ष्मीकांत आहेर यांची बिनविरोध करण्यात आली.
यावेळी संचालक सर्वश्री निवडून समाधान राजाराम आहेर, नरेंद्र कौतिकराव हिरे, सुनिल चंद्रकांत आहेर, यशवंत केवळ आहेर, पंकज सावकार, दावल भदाणे, सुलभा जितेंद्र आहेर, भाग्यश्री अतुल पवार, अनिल खंडेराव आहेर, वसंत निंबा आढाव, विष्णू शेवाळे आदींसह व्यवस्थापक दिलीप आहेर व कर्मचारी उपसस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा निवडणूक निर्णय अधिकारी वसंत गवळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान, या प्रसंगी संस्थेच्या संचालिका सुलभा आहेर यांची नगराध्यक्ष पदी तसेच उप नगराध्यक्ष पदी अशोक आहेर यांची निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.