उत्तर महाराष्ट्र

नाशिक : लहान भावासह मिळून महिलेचा विनयभंग करीत मारहाण

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : घरासमोरून चकरा का मारते अशी विचारणा केल्याचा राग आल्याने दाम्पत्याने लहान भावासह मिळून महिलेचा विनयभंग करीत तिला मारहाण केल्याची घटना देवळाली कॅम्प परिसरात घडली.

याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात पीडितेने तृप्ती व विजेंद्र परिहार या दाम्पत्यासह सिद्धार्थ कांबळे (सर्व रा. देवळाली हौसिंग सोसायटी) यांच्याविरोधात विनयभंग व मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार मंगळवारी (दि.८) सकाळच्या सुमारास संशयितांनी शिवीगाळ करीत पीडितेचा विनयभंग केला. तर सिद्धार्थ व विजेंद्र या दोघांनी मिळून पीडितेस व तिच्या मुलास मारहाण केली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT