उत्तर महाराष्ट्र

नाशिक : गट-गणावर जिल्ह्यात आणखी एक हरकत

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रारूप गट-गण रचनेवर शनिवारी (दि.4) दिंडोरीमधून आणखी एक हरकत प्रशासनाकडे दाखल झाली. त्यामुळे गट-गण रचनेवरील हरकतींची संख्या तीनवर पोहोचली आहे. दिंडोरी तालुक्यातील अरिहंतवाडी गटामध्ये देवपूर, देवठाण, कोकणगाव आणि अंबानेर या गावांचा समावेश करावा, अशी मागणी हरकतीमधून करण्यात आली आहे. यापूर्वी दिंडोरी तालुक्यातील वरखेडा तसेच निफाड तालुक्यातील सोनगाव गणाबद्दल प्रशासनाकडे दोन हरकती दाखल झाल्या आहेत. दरम्यान, प्रारूप गट-गण रचनेवर हरकती नोंदविण्यासाठी बुधवारपर्यंत (दि.8) अंतिम मुदत असणार आहे. तर दाखल हरकतींवर विभागीय महसूल आयुक्तांकडे सुनावणी होईल.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT