नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)ची वार्षिक सर्वसाधारण सभा के. आर. बुब सभागृहात पार पडली. गत बैठकीचे इतिवृत वाचून मंजूर करण्यासह विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमुखाने मंजुरी दिली.
आयमा सभागृहात आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ होते. या वेळी व्यासपीठावर सरचिटणीस ललित बुब, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सुदर्शन डोंगरे, सचिव योगिता आहेर, खजिनदार राजेंद्र कोठावदे, आयपीपी वरुण तलवार, माजी अध्यक्ष धनंजय बेळे, ज्ञानेश्वर गोपाळे उपस्थित होते.
आयमाची सूत्रे हाती घेताना जे ध्येय उराशी बाळगले होते, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आगामी वर्षातही उद्योजकांच्या विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, असे निखिल पांचाळ यांनी सांगितले. विवेक पाटील, जे. आर. वाघ, जे. एम. पवार, राजेंद्र अहिरे, एस. एस. बिर्दी यांनी उद्योजकांना एकत्रित काम करण्याचे आवाहन केले.
निखिल पांचाळ, ललित बुब आणि त्यांच्या टीमच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे उद्योजकांचे बहुसंख्य प्रश्न मार्गी लागले. सिम्बायोसिसच्या मदतीने निर्यात व्यवस्थापन प्रोग्राम हा अभ्यासक्रम सुरू केला. त्यामुळे नाशकातील निर्यातदारांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. आयमाने अंबडसह सातपूर, सिन्नर तसेच जिल्ह्यातील उद्योजकांच्या अनेक समस्या सोडविल्या आहेत. अंबड एमआयडीसीसाठी सुरू झालेली स्वतंत्र पोलिस चौकी व 10 स्वतंत्र घंटागाड्या याचा गौरवाने उल्लेख करून उपस्थित सर्व सदस्यांनी पांचाळ, बुब आणि त्यांच्या टीमच्या अभिनंदनाचा मांडलेला ठरावही यावेळी संमत झाला.
वार्षिक सर्वसाधारण सभेस आयमाचे राधाकृष्ण नाईकवाडे, जयदीप अलिमचंदानी, जगदीश पाटील, देवेंद्र राणे, अविनाश बोडके, विराज गडकरी, रवींद्र झोपे, गौरव धारकर, हेमंत खोंड, के. एन. पाटील, सिद्धार्थ रायकर, जयंत जोगळेकर, मनीष रावळ, सुमित बजाज, कुंदन डरंगे, संदीप जगताप, दिलीप वाघ, उन्मेष कुलकर्णी आदी उपस्थित होते. ललित बुब यांनी आभार मानले.
हेही वाचा :