नाशिक बस अपघात,www.pudhari.news 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : भीषण अपघातानंतर 410 खासगी बसेसवर कारवाई

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
औरंगाबाद रोडवर झालेल्या खासगी लक्झरी बस व आयशर ट्रक अपघातात बसमधील 13 जणांच्या होरपळून मृत्यू झाल्यानंतर शहराच्या वेशींवर तपासणी नाके उभारण्यात आले असून, शहरात येणार्‍या खासगी बसेसची पोलिसांकडून पाहणी केली जात आहे. गेल्या आठ दिवसांत 410 बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यात बसचालकांना नऊ लाख 15 हजारांचा दंड आकारला आहे. तर एक बस जप्त केली आहे.

शनिवारी (दि. 8) पहाटेच्या सुमारास बस आणि आयशर अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त बसमध्ये 30 आसनांची क्षमता असताना 55 प्रवासी प्रवास करताना आढळून आल्याने अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला. वाहतूक नियमांच्या सर्रास उल्लंघनाने अपघातांचे प्रमाण वाढल्याचे पुन्हा एकदा समोर आले. खासगी बसचालक-मालकांच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी खासगी बसेस चालक-मालकांची बैठक घेत त्यांना प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत सूचना दिल्या. त्याचप्रमाणे पोलिस, प्रादेशिक परिवहन विभाग यांनी संयुक्तरीत्या शहराच्या वेशींवर तपासणी नाके उभारली आहेत. त्यात शहरात प्रवेश करणार्‍या खासगी बसेसची नियमित तपासणी केली जात आहे. त्यानुसार गेल्या आठ दिवसांत पथकांनी एक हजार 41 खासगी बसेसची तपासणी केली. त्यापैकी 410 बसचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. तर एक बस जप्त केली आहे.

या ठिकाणी नाकाबंदी
शहर पोलिस व प्रादेशिक परिवहन विभागाने दिंडोरी रोड जकातनाका, पेठ रोड जकातनाका, शिलापूर टोलनाका, शिंदे पळसे टोलनाका, नववा मैल-मुंबई आग्रा रोड व गौळाणे फाटा या सहा ठिकाणी नाकाबंदी करून खासगी बसची तपासणी सुरू ठेवली आहे. प्रत्येक तपासणी नाक्यावर एक पोलिस अधिकारी, 2 पुरुष व एक महिला अंमलदार तसेच वाहतूक शाखेकडील दोन अंमलदार व प्रादेशिक परिवहन विभागाकडील एक अधिकारी असे पथक तैनात आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT