उत्तर महाराष्ट्र

नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी विद्यार्थी ठार; दिंडोरी तालुक्यातील घटना

backup backup

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील निळवंडी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दहा वर्षीय शाळकरी मुलगा ठार झाल्याची घटना घडली. आज सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, आज सायंकाळी निळवंडी शिवारातील इनामवाडी वस्ती जवळील वाघाड कॅनललगत सायंकाळी शाळा सुटल्यानंतर चार ते पाच विद्यार्थी घरी जात होते. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने करण उर्फ लहानु मच्छिंद्र गवारी (वय 10) या विद्यार्थ्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेने परिसरात शेतकरी वर्ग व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मयत करण गवारी याचा मृतदेह पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. करण हा निळवंडी येथे इयत्ता चौथीत शिकत असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT