उत्तर महाराष्ट्र

नाशिक : 20 हजारांची लाच मागणारा पोलिस जाळयात

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
खोटी तक्रार न नोंदवण्याच्या मोबदल्यात तक्रारदार युवकाकडे 20 हजार रुपयांची लाच मागणार्‍या पोलिस अंमलदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. आडगावचे पोलिस हवालदार राजेश हरी थेटे यांना लाचेची मागणी करताना पकडले आहे.

27 वर्षीय युवकाने दिलेल्या तक्रारीनुसार, आडगाव पोलिस ठाण्यात धनादेश न वटल्याप्रकरणी तक्रारदार युवकाविरोधात एकाने तक्रार दिली होती. त्यामुळे हे प्रकरण मिटवून देण्यासाठी त्याचप्रमाणे तक्रारदाराविरोधात व्याजाने पैसे दिले, अशी खोटी तक्रार न नोंदविण्यासाठी संशयित लाचखोर अंमलदार थेटे यांनी तक्रारदार युवकाकडे पैशांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

त्यानुसार सापळा रचला असता, 25 एप्रिलला थेटे यांनी तक्रारदाराकडे 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. थेटे यास संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली. अखेर पथकाने थेटे यांस लाचेची मागणी केल्याप्रकरणी अटक केली आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT