उत्तर महाराष्ट्र

नाशिक : 150 युवा वॉरियर्स शाखांच्या शुभारंभप्रसंगी उपमुख्यमंत्र्यांसह 18 प्रदेश नेत्यांची उपस्थिती

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून 18 ते 25 वयोगटांतील युवकांचे संघटन करीत युवा वॉरियर्स शाखांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या 18 प्रदेश नेत्यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्रात प्रथमच एकाच दिवशी 150 शाखांचा शुभारंभ करून नाशिक शहरात शाखांचा मेगा ड्राइव्ह करण्यात आला.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजप नेत्या पंकजा मुंडे, ना. गिरीश महाजन, अतुल सावे, माजी मंत्री जयकुमार रावल, राष्ट्रीय सहसचिव सुनील देवधर, सरचिटणीस विक्रांत पाटील, संजय केनेकर, विजय चौधरी, रणधीर सावरकर, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, खा. प्रीतम मुंडे, प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, आ. राहुल ढिकले, आ. सीमा हिरे, सुनील फरांदे यांच्या हस्ते नाशिक शहरातील 10 मंडलांत 150 शाखांचा शुभारंभ करण्यात आला. उद्घाटनासाठी युवा मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी योगेश मैंद, निखिल चव्हाण, सुदर्शन पाटसकर, किरण बोराडे, अनिकेत पाटील, भैरवी वाघ आदी पदाधिकार्‍यांनी मंडल स्तरावर प्रवास करून बैठका घेतल्या होत्या. शाखांच्या शुभारंभासंगी ढोल-ताशांच्या गजर तसेच मलखांबाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या मोहिमेसाठी भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अमित घुगे, सरचिटणीस सागर शेलार, निखिलेश गांगुर्डे, नागेश पिंगळे, ऋषिकेश आहेर, सुमित नहार, मंडल अध्यक्ष हर्षद जाधव, साक्षी दिंडोरकर आदींनी परिश्रम घेतले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT