नंदुरबार : जंगलात बकऱ्या चारणाऱ्या मुलीला एकांतात गाठून तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या तरुणाला बुधवारी (दि.२३) अटक करण्यात आली. ही घटना अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्कलकुवा तालुक्यातील कंकाळमाळ गाव हद्दीतील जंगलात ही पीडित मुलगी बकऱ्या चारण्यासाठी गेली होती. यावेळी तिला एकांतात गाठून एका तरुणाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मदतीसाठी तिने आरडा-ओरडा केल्यानंतर त्याला पकडण्यात आले. याप्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तरूणाला अटक करण्यात आली. याबाबत अधिक तपास एपीआय विश्वास पावरा करीत आहेत.