

Sexual Assault Attempt in Akola
अकोला: अकोल्यात एका तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अकोल्यातील जठारपेठ या गजबजलेल्या रस्त्यावर कारमध्ये एका तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी तरुणीने स्वतःचा बचाव करत आरोपीच्या प्रायव्हेट पार्टवर (गुप्तांग) वार करीत सुटका केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका हेल्थ इन्शुरन्स कंपनीतील पीडित 22 वर्षीय 'युनिट मॅनेजर तरुणी'सोबत कंपनीतीलच एजंट'ने हा प्रकार केला आहे. गणेश ठाकूर असे अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या कंपनीतील 'एजंट'चे नाव आहे. दरम्यान, घटनेनंतर एजंट हा मॅनेजर तरुणीला मोबाईल मेसेजद्वारे बदनामीबाबत तसेच सुसाईड करून गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊ लागला. या तक्रारीनंतर गणेश ठाकूर याच्याविरुद्ध अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.