नंदुरबार येथे लाच घेताना दोन शिक्षकांसह ३ जण अटक करण्यात आली.  File Photo
नंदुरबार

लाच घेताना दोन शिक्षकांसह ३ जण 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

Nandurbar bribery case | धुळे येथून तिघे ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : शालार्थ यादीत समावेश करणे आणि थकीत पगार काढून देणे, या मोबदल्यात लाच घेणाऱ्या दोन शिक्षकांसह तीन जणांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याप्रकरणी मोलगी (जि. नंदुरबार) येथील माध्यमिक शिक्षक नरेंद्र राजेंद्र इंद्रजीत (वय ३९ ), नंदुरबार येथील प्राथमिक शिक्षक रोशन भिमराव पाटील (वय ४०) आणि शेतकरी अरुण भगवान पाटील अशा तिघांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेले माहितीनुसार, अक्कलकुवा येथील शाळेत सन २०२१- २०२२ सालापासुन तक्रारदार यांची पत्नी तसेच कांचना केशव वळवी या दोघी शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. या दोघींचे नाव शालार्थ आय.डी. मध्ये समाविष्ठ करायचे होते. तसेच संगिता गजेंद्रसिंग ठाकूर व कांचना वळवी यांचा अडकलेला पगार काढून द्यायचा होता. याच्या मोबदल्यात धुळे येथील एजंट अरुण पाटील यांना देण्यासाठी मोलगी येथील शिक्षक इंद्रजीत व अक्कलकुवा येथील शिक्षक रोषण आदर्श पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून १ लाख १० हजार लाच मागितली.

त्यापैकी सुरुवातीला टोकन अमाऊंट प्रत्येकी २० हजार रुपये दयावे लागतील, असेही त्यांनी सांगितले. याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवल्यावर त्यांनी मागणी बाबतची पडताळणी २५ सप्टेंबररोजी पंचासमक्ष केली. नंतर सापळा रचला तेव्हा मागणी केलेली रक्कम पंचासमक्ष स्वीकारताना अरुण पाटील यांना अॅन्टी करप्शन ब्युरोच्या अंमलदारांनी धुळे येथून ताब्यात घेतले. व करप्शन ब्युरो नंदुरबार येथे आणण्यात आणले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT