Crime Pudhari
नंदुरबार

Nandurbar Crime | गणपती मिरवणुकीतील वादातून तरुणाचा मृत्यू; नऊ जणांविरुद्ध गुन्हा

शहादा तालुक्यातील काथरदे खुर्द येथील घटना; सामूहिक मारहाणीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

Shahada Ganpati Visarjan Dispute Youth Killed

नंदुरबार : गणपती स्थापनेच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादाचे पर्यावसान सामूहिक मारहाणीत होऊन एका ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शहादा तालुक्यातील काथरदे खुर्द येथे घडली. या प्रकरणी शहादा पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, संशयितांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काथरदे खुर्द येथे गणपती स्थापनेच्या मिरवणुकीदरम्यान मोग्या दौलत भील याचा काही जणांशी वाद झाला होता. त्यावेळी त्याने मांडीचे पट ठोकून आव्हान दिल्याचा राग संशयितांच्या मनात होता. याच कारणावरून मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) रात्री मोग्या भील याच्याशी पुन्हा वाद घालण्यात आला.

वाद वाढल्यानंतर संशयितांनी मोग्या भील याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले जात असतानाच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून शहादा पोलिस ठाण्यात ईश्वर रामचंद्र पवार, गौरी ईश्वर पवार, मनीष शिल्पा पाडवी, गुलाब वल्लभ ठाकरे, अनिल रमण भिल, प्रेमनाथ छगन पाडवी यांच्यासह एकूण नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संशयितांना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT