'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्‍थापक अभिजित दीपके यांनी वेली आश्रमशाळेतील मुलांशी संवाद साधला.  Pudhari
नंदुरबार

Nandurbar News : 'हाच आहे का मोदीजींचा नवा भारत?' ; नंदुरबारच्या दुर्गम भागातील पाहणीवेळी अभिजित दीपकेंचा सवाल

आदिवासी वसतिगृहे, आश्रमशाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळांची केली पाहणी

पुढारी वृत्तसेवा

Abhijit Deepke Nandurbar visit

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : नंदुरबार - दुर्गम भागातील शिक्षण, आरोग्य, पाणी या सुविधांविषयीची दुरावस्था २५ वर्षानंतरही जैसे थे असल्याचे पाहून, "हाच मोदीजींचा नवा भारत आहे का? यालाच अच्छे दिन म्हणायचे का?" असा खोचक सवाल 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्‍थापक अभिजित दीपके यांनी नंदुरबार जिल्ह्यातील दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना केला.

आदिवासी वसतिगृहे, आश्रमशाळा, जिपच्या शाळांची केली पाहणी

अभिजित दीपके यांनी आज (दि. २३) जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगाव आणि शहादा तालुक्यातील काही आदिवासी वसतिगृहे, आश्रमशाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळांची पाहणी केली. नंदुरबार येथे मुक्कामी आल्यानंतर आज धडगाव तालुक्यात जाऊन काही आश्रमशाळांना ते भेट देणार होते; परंतु अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयातील एक विद्यार्थिनी आज सकाळी संशयास्पद मृतअवस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती मिळाल्यामुळे दीपके यांनी प्रथम अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयाला भेट दिली. तसेच मृत विद्यार्थिनीच्या पालकांशी बोलून एकूण स्थितीची माहिती करून घेतली. प्रमाध्यमांशी) संबंधित एक महिला पत्रकार सहभागी होती.

इमारतीअभावी बंद पडलेल्या उपरुग्णालयाची पाहणी

दरम्यान, दुपारनंतर अक्कलकुवा तालुक्यातील वेली येथे इमारतीअभावी बंद पडलेल्या उपरुग्णालयाची त्यांनी पाहणी केली. तेव्हा त्या आवारात बांधलेल्या गाई-म्हशी पाहून त्यांनी दुर्गम भागातील सुविधांच्या कमतरतेवर बोट ठेवले. पत्र्याच्या शेडमध्ये चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळेतील दुरावस्था पाहून, "यालाच अच्छे दिन म्हणावे का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

वेली आश्रमशाळेतील मुलांशी साधला संवाद

वेली आश्रमशाळेतील मुलांशी त्यांनी संवाद साधला, तेव्हा मात्र जेवण, पाणी आणि सर्व सुविधा दर्जेदार मिळत असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. नंतर धडगाव मार्गावर काही ठिकाणी त्यांनी पाहणी केली. त्यादरम्यान उपस्थित प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिजित दीपके यांनी नाशिक येथील आदिवासी विकास विभागाच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य काय असेल?

"मुलींच्या वसतिगृहात लाईट नाही, पाणी नाही; एक-दोन किलोमीटर अंतरावरून पाणी वाहून आणावे लागते. पत्र्याच्या शेडमध्ये आश्रमशाळा चालवल्या जात असून विद्यार्थ्यांना रोज निकृष्ट जेवण दिले जात आहे. मलांना जमिनीवर झोपावे लागत आहे. सुविधा नसलेली ही व्यवस्था पाहिल्यावर आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य काय असेल? हा प्रश्न पडतो. हा तुमचा नवा भारत आहे का, हे मोदीजींना विचारले पाहिजे," असेही दीपके म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT