Illegal Liquor Smuggling Nandurbar Pudhari
नंदुरबार

Nandurbar Liquor Seizure | नंदुरबार 'एलसीबी'ची मोठी कारवाई: विदेशी मद्यासह 28 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैधरित्या विदेशी दारुची शहादा मार्गे गुजरात राज्यात चोरटी वाहतुकीचा डाव उधळला

पुढारी वृत्तसेवा

Illegal Liquor Smuggling Nandurbar

नंदुरबार : नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करीत पिकअप व्हॅन मधून वाहून नेल्या जाणाऱ्या अवैध मद्यासह 28 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार एक जण एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून ( क्र. MH 14 GD 7497) अवैधरित्या विदेशी दारु भरुन तिची शहादा मार्गे गुजरात राज्यात चोरटी वाहतूक करणार आहे, अशी खात्रीशीर गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना शुक्रवारी (दि.24) मिळाली होती. पोलीस अधीक्षक एस श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनात त्यांनी तातडीने पथक तैनात करून सापळा रचला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे शहादा शहरातील शिरुड चौफूली जवळ शहादा-प्रकाशा रोडाच्या कडेला दबा धरुन बसले. तेव्हा सकाळी 5.30 चया सुमारास शहादा शहरातुन प्रकाशाकडे पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहन (क्रमांक MH 14 GD 7497) संशयास्पद वाटल्यामुळे थांबवण्यात आले. चौकशी दरम्यान चालक देवेंद्र खुमाराम मेघवाल, वय 26 वर्षे, रा. रुपवास धोडीवाडी बास ढाणी सोजत ता. सोजत, जि. पाली राजस्थान हा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

म्हणून वाहनाची झडती घेण्यात आली. एकूण 28 लाख 87 हजार 360 रुपये किमतीचा अवैध दारुचा (217 खोके) वाहनासह असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. त्याअन्वये आरोपीविरुध्द शहादा पोलीस ठाणे येथे महा. दारुबंदी कायदा कलम 65 (ई), 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, विकास गुंजाळ, मोहन ढमढेरे, विकास कापुरे, शोएब शेख, भरत उगले, सतिश घुले यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT