नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : पतंग उडवण्यासाठी चिनी मांजा व नायलॉन मांजाच्या वापरावर पुर्ण:त बंदी घालण्यात आली असून या धोकादायक धाग्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी शुक्रवारी (दि.१२) पोलीस प्रशासन महसूल विभाग आणि अन्य संबंधित विभागांना दिले.
जिल्हाधिकारी खत्री यांनी महसूल अधिकारी, पोलीस प्रशासन, नगर पालिका प्रशासन यांची शुक्रवारी बैठक घेतली. यावेळी आपल्या कार्यक्षेत्रात बंदी असलेल्या चिनी व नायलॉन मांजाची विक्री होणार नाही, यासाठी दुकांनाची तपासणी करावी, व तपासाअंती मांजाची विक्री आढळून आल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी खत्री यांनी दिल्या.
याबाबत जिल्हाधिकारी खत्री यांनी आदेश काढला आहे. या आदेशात म्हटले आहे की, मकरसंक्रांतीला कृत्रिम वस्तूंचा वापर करून नायलॉन मांजा तयार केला जातो. हा कृत्रिम धागा माणसांसह पक्ष्यांच्या जीवासाठी धोकादायक आहे. तसेच तुटलेल्या मांजाच्या तुकड्यांचे विघटन लवकर होत नाही. हे मांजाचे तुकडे नदी- नाल्यासारख्या नैसगिक प्रवाहात अडथळे निर्माण करतात. तसेच पक्षांनी खाण्यातून हा मांजाचा तुकडा गेल्यास त्यांचा गुदमरून जीव जाण्याची शक्यता असते. त्यामुळे माजांचा वापर रोखण्यात यावा, असे आदेशात म्हटले आहे.
हेही वाचा :