उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार : मंगळी चतुर्थीच्या आदल्या दिवशीच घडले अमंगळ; दंडपाणेश्वर गणेश मूर्तीवरील चांदीचे आभूषण चोरीला

अंजली राऊत

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

शहरातील प्रसिद्ध  देवस्थान श्री दंडपाणेश्वर मंदिरातील गणेश मूर्तीवरील दोन किलो चांदीचे आभूषण तसेच चार दानपेट्या फोडून त्यातील रोख रक्कम चोरांनी लंपास केल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते माझी उपनगराध्यक्ष पोखराज जैन यांच्या साक्री रोडवरील फार्म हाऊस आवारातील जैन मंदिरातील दानपेटी फोडून पंचवीस हजार रुपये चोरांनी लंपास केले. शहर पोलीस ठाण्यात याविषयी फिर्याद दाखल होताच विविध भागात पोलीस पथक रवाना करून चोरांचा शोध घेतला जात आहे.

पोलीस पथकाने आतापर्यंत दुचाकी चोरीचे सत्र चालवले. त्या पाठोपाठ चोरांनी मंदिरांना लक्ष केले असल्याचे यावरून लक्षात येते यापूर्वीही लहान मोठ्या मंदिरातील दानपेट्या गायब करण्याचे प्रकार घडले आहेत. त्यातील काही प्रकरणी फिर्यादी दाखल होत नाहीत तोच सोमवार, दि.9 रोजी पहाटे उघडकीस आलेला प्रकार धक्कादायक आहे. घडले असे की, उद्या मंगळवार. दि.10 रोजी या वर्षाची पहिली मंगळी चतुर्थी आहे. त्याच्या आदल्याच दिवशी अत्यंत जागृत देवस्थान म्हणून परिचित असलेल्या दंडपाणेश्वर गणपती मंदिरातील चांदीची आभूषण चोरण्यात आली. एका प्रतिष्ठित गणेश भक्त व्यावसायिकाने काही दिवसांपूर्वीच चांदीत घडवलेले गणपतीचे कर्ण सोंड आणि गळ्यातील हार दंडपाणेश्वर मंदिर ट्रस्टला दान म्हणून दिले होते. आज सोमवार, दि.9 रोजी पहाटे हे सर्व आभूषण चोरीला गेले. तसेच दंडपाणेश्वर मंदिर परिसरातील चार दानपेट्यांची बंद कुलप तोडून रक्कम चोरण्यात आली. शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दंडपाणेश्वर मंदिर ट्रस्टकडून पाच ते सहा हजार रुपये गेले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. येथील मंदिर ट्रस्टने अलीकडेच पेटीतून रोज रक्कम काढून हिशोब करण्याचा पायंडा पाडला असल्यामुळे चोरांच्या हाती अधिक रक्कम लागली नाही.  मंदिर परिसरात आठ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. परंतु, चोरांनी मंदिर परिसरात प्रवेश करताच आधी डीव्हीआर फोडला. त्यानंतर दानपेटी तोडून नाल्यात फेकल्याचे मंदिर ट्रस्ट कडून सांगण्यात आले. दरम्यान, याच कालावधीत पहाटे साखरे रस्त्यावरील देवेंद्र जैन यांच्या फार्म हाऊस मधील महावीर मंदिरात देखील चोरी झाल्याचे उघड झाले आहे. येथे सुद्धा चोरांनी आधी तेथील निवासस्थानी मागील बाजूने जाळीचा दरवाजा वाकवून घरात प्रवेश मिळवला. तेथील तीन कपाटाचे बंद कुलूप तोडून सामान फेकण्यात आल. त्यानंतर बंगल्यासमोर असलेल्या मंदिरात जाऊन दानपेटी तोडली. त्यातील 25 हजार रुपये रक्कम लंपास केली. सकाळी फार्म हाऊस वरील कर्मचाऱ्यांना नाल्यात फेकलेल्या पेट्या आढळून आल्या. त्यावरुन याप्रकरणी देखील शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. दरम्यान, शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील आणि पोलीस उपाधीक्षक सचिन हिरे त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध भागात पोलीस पथक रवाना केले. तसेच संशयीतांची झाडाझडती सुरू केली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT