उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये गोवर आजाराचा शिरकाव नाही

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुंबई शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून गोवर या आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे इतरही ठिकाणच्या आरोग्य वैद्यकीय यंत्रणा जागृत झाल्या असून, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात काही ठिकाणी गोवरचे रुग्ण आढळून येत असले तरी नाशिक शहरामध्ये सध्या गोवरचा शिरकाव झालेला नसल्याचे मनपाचे प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांनी सांगितले.

पावसाळा संपल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव कमी होऊन डेंग्यू, स्वाइन फ्लू तसेच चिकुनगुणिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांना अटकाव झाला आहे. परंतु, गोवर या आजाराच्या साथीने पुन्हा चिंता निर्माण झाली आहे. मुंबईमध्ये गोवरचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरातदेखील गोवरचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये 50 हून अधिक गोवरचे रुग्ण दाखल झाले आहेत. गोवरची लागण झालेल्या संबंधितांनी गोवरची लस घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. याच अनुषंगाने नाशिक महापालिका हद्दीत गोवरचा एकही रुग्ण नसल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT