उत्तर महाराष्ट्र

मालेगाव : भाजप, ज.द.चा विरोध डावलून उर्दू घराला ‘हिजाब गर्ल्स’चे नाव, महासभेत ठराव

गणेश सोनवणे

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
भाजप, जनता दलाचा वेगवेगळ्या मुद्द्यांवरील विरोध डावलून, शहरात सुमारे आठ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या उर्दू घराला हिजाब गर्ल्स 'बीबी मुस्कान खान'चे नाव देण्याचा ठराव झाला. कर्नाटकमधील शैक्षणिक संस्थांतील ड्रेसकोड प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने, शिवसेनेने या विषयावर तटस्थ भूमिका घेतली. महापौर ताहेरा शेख यांनी हे नामकरण मुलींचे मनोबल उंचावण्यासाठीचा प्रयत्न असून, त्यात कोणत्याही प्रकारचे राजकारण नसल्याचे स्पष्ट केले.

मालेगाव मनपाची ऑनलाइन महासभा गुरुवारी (दि. 17) दुपारी चार वाजता पार पडली. 40 मिनिटे चाललेल्या या सभेत 13 विषयांवर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली. कर्नाटकमधील हिजाब प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या मुस्कान खान हिचे नाव उर्दू घराला देण्याचा प्रस्ताव महापौरांनी मांडला. त्यास भाजपचे गटनेते सुनील गायकवाड यांनी तीव्र विरोध दर्शविला, तर मालेगाव महागठबंधन आघाडीचा घटक असलेल्या जनता दलाच्या गटनेत्या शान-ए-हिंद यांनी स्वतंत्र भूमिका मांडताना, अद्याप हे काम पूर्ण झालेले नसल्याने तत्पूर्वीच अशा प्रकारे नामकरण करण्यास हरकत नोंदविली. सत्ताधारी गटाचे शिवसेनेचे उपमहापौर नीलेश आहेर यांनी हिजाब प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने नामकरणाच्या प्रस्तावावर तटस्थता दर्शविली. त्यानंतरही नामकरणाचे सर्वच विषय मंजूर करण्यात आले.

मनपात 10 वर्षे सेवा होण्यापूर्वी मृत झालेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांसाठी 10 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय झाला. शासकीय जागांवरील झोपडपट्टीधारकांना सातबारा उतारा देण्यासही मान्यता देण्यात आली. मनपाच्या कामांचे शासकीय तंत्रनिकेतन संस्था, नाशिक व सपकाळ अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत तांत्रिक लेखापरीक्षण करण्यास मंजुरी देण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून जंतुनाशक औषध खरेदीची निविदा प्रक्रिया होऊ शकलेली नाही. ती येत्या मार्चअखेर करण्याचे आदेश देण्यात आले. शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांच्या स्वच्छतेसाठी सफाई कामगार नेमणूक आणि सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचाही निर्णय झाला. स्थानिकांच्या विरोधामुळे आता चर्चे चौकऐवजी ऐश्वर्या चौकाला स्व. अस्मिता प्रताप दिघावकर यांचे नाव देण्यात येणार आहे. स्वच्छ सर्वेक्षणावरही यावेळी चर्चा झाली.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT