उत्तर महाराष्ट्र

महाविकास आघाडी म्हणजे माफिया सरकार : किरीट सोमय्यांची टीका

गणेश सोनवणे

नाशिक (घोटी) : महाविकास आघाडी म्हणजे माफिया सरकार असून, शिवसेना ही माफियांची सेना आहे. पण आता सचिन वाझे माफीचे साक्षीदार झाले आहेत. नाशिक महाविकास आघाडी सरकारच्या घोटाळ्यांचे निवासस्थान असल्याची टीका माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आघाडी सरकारवर केली.

नाशिकच्या घोटी येथे सुशासन व गरीब कल्याण अभियान अंतर्गत कार्यकर्ता-पदाधिकारी संवाद मेळाव्यात रविवारी (दि. 5) ते बोलत होते. माजी खा. सोमय्या म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरदेखील कारखान्यात बाराशे कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाल्याने पवार कुटुंबीय बेताल वक्तव्य करून दबाव तंत्रांचा वापर करत असल्याची टिका त्यांनी केली. यावेळी केदा आहेर, खंडेराव झनकर, अण्णा पवार, प्रकाश सोनवणे उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT