अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अल्पवयीन मुलीवर अत्याचार  file photo
जळगाव

Jalgaon Crime News | अल्पवयीन भाचीचा मामाकडून शेतात विनयभंग

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : बहिणीकडे आलेल्या भावाने नऊ वर्षीय भाचीला शेतात सॅंडल घेऊन देण्याच्या बहाण्याने नेले. त्यानंतर अल्पवयीन भाचीसोबत विनयभंग केला. या प्रकरणी मामाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. सॅंडल घेण्याच्या बहाण्याने मामाने शेतात नेले. त्यानंतर मामा बॅड टच करत असल्याचे मुलीच्या लक्षात येताच तिने मामाच्या तावडीतून सुटका करुन घेतली. त्यानंतर शेजारी काम करणाऱ्या काही महिलांना झालेला प्रकार सांगितला. परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ या नराधम मामाला पकडून चांगलाच चोप दिला व त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

सॅन्डल घेण्याच्या बहाण्याने सख्या मामाने आपल्या नऊ वर्षीय भाचीला शेतात नेऊन तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एका गावात घडली आहे.

जळगाव जिल्ह्यात एका तालुक्यात त्याची बहीण राहते. तो बहिणीच्या घरी आला होता. त्याने बहिणीला सांगितले की, भाचीला सोबत घेऊन जात आहे. तिला सॅंडल घेऊन देतो. त्यानंतर बराच वेळ मुलगी घरी परत न आल्यामुळे आईला चिंता लागली होती. तेव्हा परिसरातील एका शेतात काम करणाऱ्यांनी वाईट कृत्य करणाऱ्या मामाला पकडून ठेवल्याचे व पीडित बालिका रडत असल्याची माहिती मिळाली. शेताकडे बालिकेच्या कुटुंबीयांनी तत्काळ धाव घेतली त्यानंतर झालेला प्रकार लक्षात येताच आईने मुलीला कवटाळून तिला धीर दिला.

मारहाणीत जखमी झालेल्या मामाला उपचारार्थ धुळे येथे सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथून सुटी होताच त्याला पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात ‘पोस्को’ कायद्यासह इतर विविध कलमान्वये संशयिता विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी पुढील तपास करीत आहेत.

SCROLL FOR NEXT