जळगाव

Breaking news : रशियात शिक्षणासाठी गेलेल्या जळगावातील तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

दिनेश चोरगे

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : रशियातील एका समुद्रात बुडून जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रशियातील यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये हे तिघे वैद्यकीय शाखेत शिकत होते. रशियातील किनारी शहराच्या समुद्रकिनाऱ्याजवळ फेरफटका मारत असताना लाट येऊन त्यांचा बुडून मृत्यू झाला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रशिया येथील दुतावासातील कुमार गौरव (आय.एफ.एस) यांच्याशी संपर्क करून याबाबत माहिती जाणून घेतली. तसेच निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांनी पालकांना तिथल्या प्रशासनाशी संपर्क करून दिला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हर्षल अनंतराव देसले (भडगाव ), जिशान अश्पाक पिंजारी, जिया फिरोज पिंजारी ( अमळनेर ) हे विद्यार्थी रशियाच्या यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीज मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते. हे तिघे आणि त्यांचे सहअध्यायी विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाच्या मोकळ्या वेळेत संध्याकाळी येथील एका किनारी शहराच्या समुद्रकिनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते. मंगळवारी (दि.४) फेरफटका मारत असताना ही दुर्घटना घडली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने विदेश मंत्रालयाशी संपर्क करून रशियातील भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क केला. भारतीय दुतावासाने संबंधित विद्यापीठाशी संपर्क करून माहिती जाणून घेतल्याचे सांगितले असून पुढील कार्यवाही सुरु आहे. पालकांना पूर्ण ते सहकार्य करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाने भारतीय दुतावासच्या अधिकाऱ्यांना केली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT