Arrested Pudhari
जळगाव

Corruption Case | गव्हाच्या बियाण्यांचे अनुदान मिळवून देण्यासाठी मागितली लाच; कृषी अधिकाऱ्यासह एकजण अटकेत

Dhule Corruption Case | शिरपूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दणका; ५ हजारांची लाच घेताना कृषी कार्यालयातील कर्मचारी जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

धुळे: पुढारी वृत्तसेवा

गव्हाच्या बियाण्यांचे अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांची यादी प्रमाणित करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तालुका कृषी अधिकाऱ्यासह डेटा एन्ट्री ऑपरेटरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर तालुक्यातील बभळाज येथे शासनमान्य बी-बियाणे व खत विक्रीचे दुकान असणाऱ्या व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. या दुकानात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला यांच्याकडून 'कृषी उन्नती योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान' अंतर्गत गव्हाचे प्रमाणित बियाणे वितरित केले जाते.

तक्रारदार यांनी त्यांच्या दुकानामार्फत महामंडळाकडून शासकीय अनुदानित गव्हाचे बियाणे खरेदी करून ते सन २०२५-२०२६ मध्ये ९० शेतकऱ्यांना शासनाचे अनुदान वजा करून विक्री केले होते.

या ९० शेतकऱ्यांना विक्री केलेल्या गव्हाच्या बियाण्यांवरील १ लाख ४० हजार रुपये शासकीय अनुदान महामंडळाकडून मिळण्यासाठी शेतकऱ्यांची यादी आणि आवश्यक कागदपत्रे तक्रारदार शिरपूर येथे जमा करण्यास गेले होते.

यावेळी तालुका कृषी कार्यालयातील डेटा एन्ट्री ऑपरेटर सुनील पाटील यांनी कागदपत्रे जमा करून घेतली. मात्र, विक्री केलेल्या गव्हाच्या बियाण्यांचे अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांची यादी प्रमाणित करण्याकरिता तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांच्यासाठी ५ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगून लाचेची मागणी केली.

त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे कार्यालयात समक्ष हजर राहून तक्रार दिली होती. या तक्रारीची उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या पथकाने पडताळणी केली असता, डेटा एन्ट्री ऑपरेटर सुनील पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केले.

तसेच लाच मागणीला तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांनी दुजोरा देऊन प्रोत्साहन दिले. त्यानंतर आज झालेल्या सापळा कारवाई दरम्यान सुनील पाटील यांना तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी सुनील पाटील व तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT