भुसावळ पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली रिवॉल्वर Pudhari Photo
जळगाव

जळगाव : भुसावळ आणि एरोडलातून गावठी कट्टे जप्त

पुढारी वृत्तसेवा

जळगाव जिल्ह्यामध्ये अवैध गावठी कट्ट्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. असून कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर भुसावळ एरंडोल मधून दोन गावठी कट्टे व एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, भुसावळ शहर पोलीस गस्त घालत असताना सुत्रांकडून माहिती मिळाली की, एक तरुण दोन कट्टे जवळ बाळगून येत आहे. तेव्हा पोलिसांनी संशयित आरोपी जगन धर्मा सोनवणे (रा.अयोध्या नगर, भुसावळ) त्याची अंग झडती घेतली असता त्याचे उजवे बाजुचे कंबरेला एक गावठी कट्टा मक्झीन सह मिळुन आला. भुसावळ शहर पोलीस स्टेशन पोलिस शिपाई राहुल भोई यांचे फिर्यादी वरुन सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना माहिती प्राप्त झाली की, एक इसम हा कमरेला पिस्टल लावुन चोरीच्या मोटार सायकल वर एरंडोल शहरात फिरुन दहशत करीत आहे. यावेळी पोलिसांनी पथक तयार करून आरोपीस ताब्यात घेण्याचे सागितले. अज्ञात इसमाचा शोध घेवून त्यास एरंडोल शहरातून ताब्यात घेवून त्याची विचारपूस केली. तेव्हा एक बंदुक आणि एरंडोल शहरातुन चोरी केलेली मोटारसायकल असे मिळुन एकुण ५० हजार रुपयाचा मुददेमाल जप्त केला. सदर गुन्ह्याची कारवाई डॉ.महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंमळनेर सुनिल नंदवाळकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT