संतनाथ यात्रेच्या पूर्वसंध्येला तरुणाकडून गावठी बंदूक हस्तगत

वैराग पोलिसांकडून कारवाई; मोबाईल मधल्या फोटोमुळे झाला भांडाफोड
indigenous gun seized from youth, action taken by Vairag police
संतनाथ यात्रेच्या पूर्वसंध्येला तरुणाकडून गावठी बंदूक हस्तगत Pudhari Photo
Published on
Updated on

वैराग : पुढारी वृत्तसेवा

वैराग मधील रहिवाशी असलेल्या दोघा तरुणांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या किरकोळ भांडणावरून वैराग पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान त्यांच्या मोबाईलची सखोल तपासणी केली असता,एकाकडे गावठी बंदूक बाळगल्याचा फोटो मोबाईल मध्ये आढळून आला. फोटोबाबत पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना संशयीतांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्‍यामुळे पोलीसांचा संशय बळावला. त्यावरून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, वैराग येथील संतनाथ यात्रेपुर्वी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

वैराग येथे ग्रामदैवत श्री संतनाथ महाराज यांची यात्रा उत्सव १५ ऑगस्ट पासून सुरू होत आहे. त्या निमित्ताने सोमवारी सायंकाळी वैराग पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता बैठक आयोजित केली होती.

दरम्यान यात्राकाळात वैराग शहरात असणाऱ्या प्रमुख लेझिम पथकांच्या सदस्यांचा रात्री सराव सुरु होता. यावेळी रात्री मोहोळ चौकात अभिजीत प्रमोद येळणे व अक्षय अंधारे यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यांनतर दोघेही पोलीस ठाण्यात आले. त्यांच्यातील वाद मिटण्या ऐवजी वाढतच गेला. दरम्यान पोलीसांनी हस्तक्षेप करून दोघांचेही मोबाईल ताब्यात घेतले. त्यांचे मोबाईल तपासताना अभिजीत येळणे याच्या मोबाईलमध्ये एक गावठी बनावटीचीच्या बंदुकिचा फोटो आढळला. त्यावरून येळणे याचा कसून तपास केला असता, त्याने शहराजवळील स्वतःच्या शेतात लपवून ठेवलेले गावठी बनावटीची बंदुक सकाळी सव्वासात वाजण्याच्या दरम्यान ताब्यात घेतली.

वैराग पोलीस ठाण्यामध्ये यापूर्वी देखील बेकायदेशीररित्या बंदूक वापरल्‍या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा जिवंत काढतुसांसह गावठी बनावटची पिस्तूल जप्त करण्यात आल्यामुळे आणखीन कुणाकडे अशा प्रकारच्या बंदुका आहेत का? याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news