जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यातील उंदिरखेडे येथे एका २५ वर्षीय होतकरू अभिनेत्याने गळफास घेऊन आयुष्य संपविल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.  pudhari news network
जळगाव

Sachin Chandwade : मराठी अभिनेत्याने अवघ्या 25 व्या वर्षीच संपवलं आयुष्य

मराठी कलाविश्वावर शोककळा : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील उंदिरखेडे येथे राहत होता सचिन

अंजली राऊत

जळगाव : जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यातील उंदिरखेडे येथे एका २५ वर्षीय होतकरू अभिनेत्याने गळफास घेऊन आयुष्य संपविल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सचिन गणेश चांदवडे असे या मराठी अभिनेत्याचे नाव आहे. सचिन लवकरच जमतारा २, असुरवन या दोन सिनेमांमधून आपल्याला भेटणार होता. याशिवाय तो पुणे आयटी पार्कमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणूनही काम करत होता. या घटनेमुळे उंदिरखेडे गावावर तसेच संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. ही घटना ऐन भाऊबीज दिवशी गुरुवार (दि.23) रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

नेमकं काय घडलं बरं?

सचिन याने पारोळा येथील राहत्या घराच्या वरील मजल्यावर असलेल्या एका रूममध्ये पंख्याला गळफास घेऊन आपले जीवन संपिवले. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने खाली उतरवून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, सचिनची प्रकृती खालावल्याने अधिक उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले. मृत्यूशी सुरू असलेली त्याची झुंज अपयशी ठरली आणि शुक्रवार (दि.24) रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान सचिनचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अभ्यासातही हुशार असलेल्या सचिनला अभिनयाची आवड

सचिन हा एक हुशार सॉफ्टवेअर इंजिनिअर होता आणि पुणे येथील एका प्रतिष्ठित आयटी पार्कमध्ये नोकरीला देखील होता. सचिनला लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. आवड जोपासत मुंबई आणि पुणे येथील सिनेसृष्टीतही अभिनयाचे काम केले.

'असुरवन' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार होता

सचिनची भूमिका 'असुरवन' या सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार होता. याबाबत पाचच दिवसांपूर्वी सचिनने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. तर जमताराच्या दुसऱ्या सिझनमध्येही तो झळकणार होता. विषय क्लोज नावाच्या फिल्ममध्येही त्याचं दर्शन घडलं होतं. याशिवाय ढोल ताशा पथकातही तो सक्रिय होता. गणेशोत्सव, गुढीपाडवा यानिमित्ताने त्याने अनेक मराठी कलाकारांसोबत ढोल वादन केल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

जीवनयात्रा संपविण्यामागील कारण अस्पष्ट

young आणि Multidimensional व्यक्तिमत्त्वाच्या सचिनच्या अशा अचालक एक्झिटमुळे मराठी मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेप्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अद्यापही सचिनच्या जीवनयात्रा संपविण्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT