जळगाव

राष्ट्रीय फेडरेशन चषक कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडेला उपविजेतेपद

गणेश सोनवणे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – विशाखापट्टणम येथे १० ते १३ डिसेंबर दरम्यान नुकतेच संपन्न झालेल्या २८ व्या राष्ट्रीय फेडरेशन चषक कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चा खेळाडू योगेश धोंगडेने नामवंत खेळाडूंचा पराभव करून उपविजेतेपद प्राप्त केले.

त्यात प्रामुख्याने सध्याचा विश्वविजेता खेळाडू संदीप दिवे याचा उपांत्यफेरीत तसेच सध्याचा विश्वउपविजेता खेळाडू आयकर विभागाचा अब्दुल रहेमान याचा चौथ्या फेरीत पराभव केला. तत्पूर्वी दुसऱ्याफेरीत सिव्हिल सर्विसेसच्या एम.अशोककुमारचा, तिसऱ्याफेरीत पेट्रोलियमच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू के. रामेश्बाबुचा आणि उपउपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या विकास धारियाचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून उपांत्य फेरत प्रवेश केला. अंतिम फेरीत मात्र तो उत्तरप्रदेशच्या मोहम्मद आरिफ विरुद्ध पराभूत झाला. योगेश धोंगडे यास रोख रुपये १५,०००/- आणि चषक पारितोषिक तसेच आंतराष्ट्रीय स्पर्धेच्या निवडीकरिता महत्वपूर्ण सात गुण प्राप्त झाले. त्याच्या या यशस्वी कामगिरी करिता जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सह व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, मुख्य प्रशासकीय क्रीडाधिकारी अरविंद देशपांडे, क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी, सय्यद मोहसिन आदींनी अभिनंदन केले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT