अपघात रोखण्यासाठी किनगाव पोलिसांचा पुढाकार  pudhari photo
जळगाव

Jalgaon police safety drive : अपघात रोखण्यासाठी किनगाव पोलिसांचा पुढाकार

मोटारसायकल चालकांनी हेल्मेट, कार चालकांना सीट बेल्ट वापरण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

किनगाव :काही वर्षांपासून रोडवर होणाऱ्या वाहनांचे अपघाताचे प्रमाण वाढत असून त्याला आळा बसावा यासाठी किनगाव पोलिसांनी रस्त्याच्या बाजूला बॅनर व अपघात ग्रस्त मोटारसायकल लावून अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मोटारसायकल वाहनधारकांनी डोक्याला हेल्मेटचा वापर करावा तर कार चालकांनी सीटबेल्टचा वापर करावा असे आवाहन किनगाव पोलिसांनी केले आहे.

सर्वत्र रस्ते अपघातामध्ये वाढ झाली आहे. त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यावर तातडीने आणि प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली किनगावचे सपोनी व कर्मचारी हे अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.सर्व वाहनधारकांनी वाहन चालवताना योग्य ती काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे .

हेल्मेट व सीटबेल्ट वापराबाबत पोलिसांनकडून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. बहुतांश अपघातांमध्ये दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर न करणे आणि चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट न वापरणे हे मृत्यूचे प्रमुख कारण ठरत असल्याचे सांगीतले जात आहे.या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

किनगाव पोलिसांनी अहमदपूर अंबेजोगाई रोडच्या रस्त्याच्या बाजूला अपघात ग्रस्त वाहन व बॅनर लावून वाहनधारकांना सुरक्षेच्या दृष्टीने सूचना करण्यात आल्या आहेत.लातूर पोलीस दलाकडून नागरिकांमध्ये हेल्मेट व सीटबेल्ट वापराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष मोहिमा राबविली जात आहे.

किनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघाताचे प्रमाण कमी व्हावेत यासाठी सपोनी माणिक डोके, उपनिरीक्षक तानाजी वलमपल्ले व सर्व पोलीस बांधव परिश्रम घेत आहेत. या उपक्रमा बद्दल त्यांचे कौतुक नागरिकांतून होत आहे.

सर्व वाहन चालकास आवाहन करण्यात येते की वाहतुकीच्या नियमाचे पालन करावे दुचाकी वर दोन्ही प्रवाशांनी हेल्मेट वापरावे चार चाकीतील सर्व प्रवाशांनी सीटबेल्ट वापरावा. वाहनाचे इन्शुरन्स व कागदपत्र बाळगावे,वाहन चालकाचा परवाना असल्याशिवाय वाहन चालवू नये तसेच वेग मर्यादा पाळावी. पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना चालक परवाना नसल्यामुळे वाहन चालवण्यास देऊ नये. दारू पिऊन वाहन चालवू नये व चालवण्यास प्रोत्साहन देऊ नये. वाहतुकीचे नियम पाळावे आणि सुरक्षित प्रवास करावा.आपली आई,वडील,लहान मुले, बहिण , भाऊ आपली वाट पाहत आहेत याची जाणीव ठेवून सुरक्षित प्रवास करावा.
माणिक डोके , सहायक पोलिस निरीक्षक किनगाव तालुका अहमदपूर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT