जळगाव

जळगाव : वारा उधानाच्या फेऱ्यात अडकले भुसावळचे अग्निशामक दल

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – भुसावळ नगरपरिषदेची दुरवस्था झाली असून स्वतःची हक्काची इमारत नाही. सांस्कृतिक भवन व व्यावसायिक कॉम्प्लेक्समध्ये नगरपालिकेचा कारभार अडकून पडला आहे. याच ठिकाणी अग्निशामक दलाचे नवीन वाहने उभ्या करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी शनिवार (दि.२५) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास वादळी वारा आल्याने इमारतीच्या भिंतीवरचे  कठडे तुटल्यामुळे अग्निशामक दलाच्या नवीन वाहनांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणीताही अग्निशामक दलाचा कर्मचारी जखमी झालेला नाही. अग्निशमन दल शहरातील व परिसरातील कोणत्याही प्रकारचे संकट आल्यानंतर धावून मदत करते. मात्र आत हेच विभाग उधानाच्या फेऱ्यात अडकले असल्यचो चित्र होते.

भुसावळ शहराची ओळख राज्यामध्ये भुसावळ जंक्शन म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर इंग्रजांच्या काळात बांधलेली भुसावळ नगरपरिषदेला जवळपास दीडशे वर्षांपेक्षा जास्त मोठा इतिहास आहे. ही इमारत धोकादायक झाल्यामुळे गेल्या पाच सहा वर्षांपासून भुसावळ नगर परिषदेने कारभार चालवण्यासाठी सांस्कृतिक भवन व त्या ठिकाणी असलेल्या व्यापारी संकुलामध्ये संपूर्ण नगरपरिषदेचे कारभार सुरू करण्यात आला आहे. तर जुनी इमारत पाडण्यात आली आहे.

शहरातली शांतीनगर मधील सांस्कृतिक भवन व व्यापारी संकुलात भुसावळ नगर परिषदेचे कार्यालय सुरू आहे. त्याच व्यापारी संकुलनात अग्निशामक दलाचे कार्यालय आहेत. भुसावळ जंक्शन स्टेशन एमआयडीसी दिपनगर व रेल्वे व नागरिकांसाठी अग्निशामक बंब टँकर व इतर वाहनांचा उपयोग व कार्यालयाचा कारभार या ठिकाणाहून चालते. शनिवार (दि.२५) रोजी सायंकाळी उधान वारा सुरू झाल्यानंतर याच व्यापारी संकुलामधील असलेल्या अग्निशामक दलाच्या इमारतीवरील कठडे तुटून अग्निशामक दलाच्या नवीन गाडीवर पडल्यामुळे गाडीचे नुकसान झाले मात्र यावेळी अग्निशामक दलाचे कर्मचारी हे मैदानात नसल्यामुळे कोणालाही आघात झाला नाही

उधान वाऱ्याच्या विळख्यापासून कर्मचारी थोडक्यात बचावले असले तरी भविष्यात संभाव्य धोका होऊ शकतो. त्यामुळे भुसावळ नगरपरिषदेची स्वतःच्या मालकीची हक्काची इमारत कधी उभारणार हा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर आहे. काही वर्षांपूर्वी बीओटी तत्त्वावर भुसावळ नगर परिषद बांधण्याचा प्रस्ताव देण्यात आला मात्र तोही बारगळला गेला.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT