सुप्रीम कॉलनी येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला. Pudhari
जळगाव

Jalgaon Crime | सुप्रीम कॉलनी येथील घरफोडीचा छडा; दोन जण गजाआड

एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Supreme Colony burglary

जळगाव: येथील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील सुप्रीम कॉलनी येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला. याप्रकरणी दोन गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि. १३) फिर्यादी शरीफ मुराद खाटिक, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव हे चाळीसगाव येथे एका लग्न समारंभासाठी गेले होते. याच दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराचे कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४९ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राहुल गायकवाड यांना माहिती मिळाली की गुन्हेगार शकील शेख ताजुद्दीन शेख ऊर्फ बंदर (रा. कासमवाडी, जळगाव) आणि साहिल शहा सद्दाम शहा ऊर्फ काल्या (रा. तांबापुरा, जळगाव) यांनी केली आहे.

या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कासमावडी परिसरातून आरोपींना त्वरित ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.

गुन्हा कबूल केल्यानंतर दोन्ही आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. नमुद दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापूर्वीही घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोहेकॉ किरण चौधरी हे करत आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी, नितीन गणापुरे, उपविभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक . राहुल गायकवाड, तसेच पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ अक्रम शेख, विजय पाटील, किशोर पाटील, राहुल रगडे, रविंद्र कापडण, गोपाल पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT