Silver Price Update  Pudhari
जळगाव

Silver Price Hike | चांदीची एका दिवसात तब्बल २२ हजारांची उसळी; ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री

Jalgaon Gold Silver Rate | दरांचे आकडे पाहून ग्राहकांसह व्यापाऱ्यांचेही डोळे विस्फारले

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra Silver Market Update

जळगाव : 'सुवर्णनगरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफा बाजारात आज (दि.२३) दरवाढीचा जणू स्फोटच झाला. अवघ्या एका दिवसात चांदीने तब्बल २२ हजार रुपयांची ऐतिहासिक झेप घेतली. सोन्यानेही तोऱ्यात ४,३०० रुपयांची आघाडी घेतली आहे. गुरुवारी (दि. २२) शांत असलेला बाजार शुक्रवारी (दि. २३) सकाळी उघडताच दरांचे आकडे पाहून ग्राहकांसह व्यापाऱ्यांचेही डोळे विस्फारले आहेत.

नेमका बदल काय?

जळगाव सराफा बाजारात गुरुवारी (दि. २२) २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ५१ हजार ५०० रुपये होता, जो शुक्रवारी (दि. २३) थेट १ लाख ५५ हजार ८०० रुपयांवर पोहोचला. दुसरीकडे, चांदीने तर सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. ३ लाख ८ हजार रुपयांवर असलेली चांदी एका दिवसात ३ लाख ३० हजारांवर पोहोचली आहे. ऐन लग्नसराईच्या तोंडावर ही दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

दरांचे 'ब्लास्ट' (एका दिवसातील तफावत)

एका दिवसातील वाढ

२४ कॅरेट सोने (तोळा)

₹ १,५१,५०० (२२ जानेवारी २०२६ )

₹ १,५५,८००(२३ जानेवारी २०२६)

+ ₹ ४,३००

२२ कॅरेट सोने (तोळा)

₹ १,३८,७७४(२२ जानेवारी २०२६ )

₹ १,४२,७००(२३ जानेवारी २०२६)

+ ₹ ३,९२६

चांदी (किलो)

₹ ३,०८,०००(२२ जानेवारी २०२६ )

₹ ३,३०,०००(२३ जानेवारी २०२६)

+ ₹ २२,०००

सोन्या-चांदीच्या या अवाढव्य वाढीमुळे सामान्य गुंतवणूकदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. २२ कॅरेट दागिन्यांच्या सोन्याचा दरही आता दीड लाखांच्या उंबरठ्यावर (१,४२,७०० रु.) पोहोचल्याने, लग्नासाठी दागिने खरेदी करणे आता कठीण झाले आहे. चांदीने ३ लाखांचा टप्पा ओलांडून ३ लाख ३० हजारांवर मजल मारल्याने, औद्योगिक मागणी आणि गुंतवणुकीचा ओघ यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT