जळगाव

जळगाव : पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या तोतया अधिकाऱ्यांना बेड्या

गणेश सोनवणे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा -चोपडा शहरात असलेल्या जय हिंद कॉलेज या ठिकाणी तीन जणांनी औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे खोटे सांगून गुटखा विक्री करीत असल्याने कारवाईची भीती घालून कारवाई न करण्यासाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी चोपडा शहरात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोपडा शहरातील जय हिंद कॉलेज भागामध्ये (दि. 19) दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास संशयित आरोपी राहुल शिवाजी देवकते  (पंढरपूर), विनायक सुरेश चौरे ( गोविंदपुरा),  लक्ष्मण ताड (गुर्जर वाडा)  यांनी स्वतःला औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून जितेंद्र गोपाळ महाजन व त्यांचे मित्र सचिन अरुण पाटील यांना चोरून लपून गुटखा विक्री करीत असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची भीती घालून कारवाई न करण्यासाठी पाच लाख रुपयाची खंडणी मागितली. जितेंद्र महाजन व औषध प्रशासन विभागाची फसवणूक केल्याने चोपडा पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे करीत आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT