जळगाव: जागतिक बाजारातील घडामोडी आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल याचा थेट परिणाम जळगावच्या सराफा बाजारावर झाला आहे. अवघ्या २४ तासांत चांदीच्या दरात प्रति किलो ८ हजार रुपयांची मोठी वाढ झाली असून, सोन्यानेही नवे उच्चांक गाठले आहेत.
नाताळच्या सुट्ट्या आणि लग्नसराई सुरू असल्याने बाजारात मागणी कायम आहे. त्यातच झालेल्या या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे.
सोन्या-चांदीचे आजचे दर (२५ व २६ डिसेंबर)
२२ कॅरेट सोने (प्रति तोळा):
२५ डिसेंबर – १,२५,२००
२६ डिसेंबर – १,२६,०००वाढ – ८००
२४ कॅरेट सोने (प्रति तोळा):
२५ डिसेंबर – १,३६,७००
२६ डिसेंबर – १,३७,६००
चांदी (प्रति किलो): वाढ – ९००
२५ डिसेंबर – २,२२,०००
२६ डिसेंबर – २,३०,०००
वाढ – ८,०००
२५ डिसेंबर रोजी २,२२,००० रुपये प्रति किलो असलेली चांदी थेट २,३०,००० रुपयांवर पोहोचली आहे. एका दिवसातील ही झपाट्याने झालेली वाढ सराफा बाजारात चर्चेचा विषय ठरली आहे.