जळगाव

Jalgaon News I पारोळा जवळील गॅस स्फोटात नऊ गॅस सिलेंडरसह दोन ओमनी खाक

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा 
पारोळा तालुका, म्हसवे गाव येथे झालेल्या गॅस सिलेंडर स्फोटात दोन ओमनी खाक झाल्या असून एकूण 21 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. सदर ठिकाणाहून दोन लाख पन्नास हजार आठशे रुपयांच्या मुद्देमाल मिळून आला आहे तर याप्रकरणी पुरवठा निरीक्षक यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारोळा पोलिसात मोठा भाऊ या संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा तालुक्यातील म्हसवे गावाजवळ दि. 19 रोजी रात्री मोठा गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या ठिकाणी झालेल्या स्फोटामुळे दोन किलोमीटर पर्यंत आगीचे लोट दिसत होते. सिलेंडरच्या स्फोटामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली होती. तसेच या ठिकाणी अवैधरीत्या गॅस भरण्यात येणाऱ्या दोन ओमनी वाहनांना आग लागल्याने वेळीच अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक विश्वजीत सिंह, विजय सिंह गिरासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसात मोठा भाऊ उर्फ खंडेराव रामराव पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT