जळगाव : बांगलादेश येथे अल्पसंख्यांक हिंदूंवर होणारे अत्याचारा विरोधात सकल हिंदू संघटनांनी बंदचे आवाहन केले. शहर परिसरातून सकल हिंदू समाजाकडून शांतता रॅली काढण्यात आली. यावेळी होंडा शोरूम सुरू असल्याने रॅलीतील नागरिक आणि दुकानातील कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून शोरूमवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी मात्र अजून कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
याबाबत मिळालेल्या सूत्रांकडून माहिती अशी की, बांगलादेश येथे सुरू असलेल्या राजकीय वातावरणामुळे अल्पसंख्यांक हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणात अन्यास होत आहे. हा हिंसाचारावर थांबवण्यासाठी सकल हिंदू समाजाने जळगाव बंदची हाक दिली. या हाकेला प्रतिसाद देत संपूर्ण जळगाव जिल्हा हा शंभर टक्के बंद ठेवण्यात आला आहे.
शुक्रवार (दि.16) सकाळी काढण्यात आलेला मोर्चाच्या वेळी होंडा शोरूम सुरु असल्याचे दिसले. त्यामुळे मोर्चेकरांनी शोरूम बंद करण्यासाठी सांगितले. मात्र शोरु बंद न करता यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीतून राम होंडा यांचे शोरूमवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये शोरुमच्या काचा फुटल्या. शोरुमच्या बाहेर काच व दगडांचा खच पडलेला आहे.