

जळगाव : बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात जळगाव जिल्हा येथे विविध हिंदू संघटनांनी बंदचे आवाहन केले आहे. त्यास शुक्रवार (दि.16) सकाळपासून व्यापारी व इतर संघटनांनी सहकार्य करीत 100 टक्के बंद ठेवला आहे. त्यामुळे एसटी वाहतूकीसह इतर वाहतूकीवरही परिणाम झालेला दिसून येत आहे.
बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे आणि राजकारणामध्ये झालेल्या बदलामुळे व तेथे असलेल्या अल्पसंख्यांक हिंदू समाजावर अन्याय होत आहे. शासनासोबतच हिंदू समाजावरही या अन्यायाचा परिणाम होत आहे. हिंदूंवर मुख्यतः अल्पसंख्यांकांवर अत्याचार करण्यात येत आहे. हा सर्व विरोध करण्यासाठी जळगाव जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. सकल मराठा समाज व्यापारी संघटना तसेच इतर हिंदू संघटनांनी प्रतिसाद देत आज शुक्रवार (दि.16) संपूर्ण जळगाव जिल्ह्यात शंभर टक्के बंद ठेवण्यात येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाची असलेली सोन्याची व्यापारपेठ सुद्धा आज बंद असल्याने सराफ बाजारात शुकशुकाट दिसून येत आहे. तर ठिकठिकाणी पोलींसाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदमुळे मोठ्या प्रमाणात सोन्याच्या व्यवहार ठप्प झालेले आहेत. तर 16 तारखेला बंदची हाकेमुळे 15 ऑगस्टच्या रोजी शहरात बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
बंदचा फटका एसटी महामंडळालाही बसलेला दिसून येत आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत एसटी महामंडळाच्या बस स्थानकावर असलेली गर्दी शुक्रवारी मात्र विरळपणे दिसून येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला ही आर्थिक फटका बसला आहे.