जळगाव

Jalgaon News : 11 नगरपालिकांतून 51 लाखाचा कर वसूल

गणेश सोनवणे

जळगांव – नागरिकांकडून मालमत्ता कर व इतर करांचा भरणा करुन घेण्यासाठी जिल्ह्यातील नगरपरिषदेंद्वारे विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मोहिमेत जळगाव जिल्ह्यातून नगरपरिषदांनी 51 लाख 86 हजार 91 रुपयाचा महसूल गोळा केला आहे. भुसावळ १२,८२,२३९, अमळनेर ९,७५,६७१, चोपडा  ७,६९,५६४ यांनी सर्वाधिक कर वसूल करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील नगरपरिषदांनी घरोघरी भेटी देऊन नागरिकांकडून कर वसुली मोहीमेला सुरुवात केली आहे. कर वसुली मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून नागरिकांकडून नगरपरिषदेच्या थकीत करांचा भरणा करणेत येत आहे. जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांनी कर वसूली साठी विशेष पथकांची नियुक्ती केली असून दैनंदिन करवसूली चा आढावा मुख्याधिकारी यांचेकडून घेण्यात येत आहे. नियुक्त विशेष पथके शहरातील विविध भागांत करदात्यांच्या भेटी घेऊन करवसुली मध्ये महत्त्वाचे योगदान देत आहेत.

मुदतीत व परिपूर्ण कर वसूली मुळे नागरिकांना नागरी सुविधा प्रदान करणे, स्वच्छता राखणे, नगरपरिषदेद्वारे संचलित होणारे दैनंदिन कामे करणे सुकर होते. यामुळे नगरपरिषद आर्थिकदृष्ट्या सक्षम होवुन नवनवीन योजना संकल्पना राबविण्यास मदत होते.

 ११ नगरपालिका मधून १४ डिसेंबर रोजी झालेली करवसुली

अमळनेर : ९,७५,६७१-
वरणगाव : ८९,६०६
एरंडोल : ३,७०,३१९
रावेर : ३,३७,१२५
चाळीसगाव :१,२१,८९०
सावदा : १,६६,५५६
जामनेर : ४,२८४१५
पाचोरा : ५,८७६७०
भुसावळ : १२,८२,२३९
भडगाव : २,३७,०३६
चोपडा : ७,६९,५६४

नगरपरिषदेकडे आपली देणी प्रलंबित असल्यास ती तात्काळ जमा करुन नगरपरिषदेला सहकार्य करावे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT