Temple Bell Theft Pudhari
जळगाव

Temple theft भक्ताच्या वेशातील चोरट्याने मारुती मंदिरावर मारला डल्ला; CCTVच्या आधारे २४ तासांत आवळल्या मुसक्या

उत्रड शिवारातील पिंपरखेड मारोती मंदिरातील ६५ हजारांचे चांदीचे दागिने हस्तगत; संशयित आरोपी हिरापूरचा

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : पारोळा तालुक्यातील पिंपरखेड (उत्रड शिवार ) येथील ऐतिहासिक मारोती मंदिरात दर्शनाच्या बहाण्याने आलेल्या एका ने देवाच्या मूर्तीवरील ६५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली होती. , पारोळा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने 'सीसीटीव्ही' फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या २४ तासांच्या आत चोराचा माग काढून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जून रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास पिंपरखेड मारोती मंदिरात एक अनोळखी इसम आला. काही वेळ मंदिरात थांबून आणि मनोभावे दर्शन घेऊन तो निघून गेला. त्यानंतर मंदिराचे पुजारी आसाराम त्र्यंबक पाटील (रा. बहादरपूर, ता. पारोळा) यांनी नेहमीप्रमाणे मंदिर बंद केले आणि ते झोपायला गेले.

दुसऱ्या दिवशी, म्हणजेच ९ जून रोजी सकाळी ५:३० वाजता पुजारी नेहमीप्रमाणे मंदिराची साफसफाई करण्यासाठी आले असता, त्यांना मारुती रायाच्या मूर्तीवरील दागिने गायब असल्याचे दिसून आले. मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. ५०,००० रुपये किमतीचा ५०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट, १५,००० रुपये किमतीची १५० ग्रॅम वजनाची कानातील चांदीची मासळी अशी एकूण : ६५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरण्यात आला आहे. याप्रकरणी पुजारी आसाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पारोळा पोलीस ठाण्याचे सपोनि योगेश महाजन यांनी विशेष पथकाने मंदिरातील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये रात्री दर्शनाला आलेला तोच अनोळखी इसम संशयास्पद हालचाली करताना कैद झाला होता. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी हिरापूर (ता. पारोळा) येथील संशयित हिरालाल अरुण पाटील याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच ८ जूनच्या रात्री पिंपरखेड मारोती मंदिरात आपणच चोरी केल्याची कबुली दिली.

संशयित आरोपी याच्या राहत्या घरातून पोलिसांनी चोरीला गेलेला ५०० ग्रॅमचा चांदीचा मुकुट आणि १५० ग्रॅमची चांदीची मासळी असा एकूण ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास साळुंखे करत आहेत.

यांनी केली धडक कारवाई

सदरची कामगिरी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अमळनेर भागाचे एसडीपीओ विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि योगेश महाजन, कैलास साळुंखे, संदीप अशोक सातपुते, अजय बाविस्कर, आकाश माळी, सुनील पाटील, अभिजीत पाटील, गिरीश सोनवणे, अनिल राठोड यांच्या पथकाने करून हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT