जळगाव

Jalgaon News | त्या कर्जबाजारी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

गणेश सोनवणे

जळगाव पुढारी वृत्तसेवा –  एरंडोल तालुक्यातील खेडगाव येथील राहणारे (४६) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना मंगळवाारी दि. १८ जून रोजी मध्यरात्री २ वाजता त्यांचा मृत्यू झाला. याबाबत जिल्हापेठ पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

एरंडोल तालुक्यातील खेडगाव येथे किसन मोरसिग राठोड हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होते. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. शेतीत ते कर्जबाजारी झाले होते. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी शनिवारी दि. १५ जून रोजी दुपारी २ वाजता राहत्या घरी विषारी औषध सेवन केले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी खासगी वाहनाने तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना मंगळवारी १८ जून रोजी मध्यरात्री २ वाजता त्यांच्या मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात पत्नी लताबाई आणि अनिल व सुनिल असे दोन मुले असा परिवार आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा –

SCROLL FOR NEXT