जळगाव– बँकांच्या एटीएम मध्ये पैसे भरण्याची जबाबदारी असणाऱ्या खाजगी कंपनीच्या तीन जणांनी एटीएम मध्ये भरण्यासाठी दिलेल्या रकमेत 64 लाखांचा अपहार केला आहे. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना चाळीसगाव पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चाळीसगाव शहर व त्यांच्या आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये एटीएम मध्ये पैसे भरण्याची जबाबदारी एका खाजगी कंपनीला दिलेली आहे. या खाजगी कंपनीने एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी वेळोवेळी रोख रक्कम कंपनीचे कर्मचारी असलेले संशयित आरोपी प्रवीण देविदास गुरव, दीपक भिकन पवार दोन्ही रा. पाटणादेवी रोड, आदित्य नगर, चाळीसगाव यांनी एटीएम मध्ये दिलेली पूर्ण रक्कम न भरता त्यावरून थोडी थोडी रक्कम काढून अशी एकूण 64 लाख 82 हजार दोनशे रुपयांचा अपहार केला व कंपनीचा विश्वासघात केला.
ऑडिटर चंद्रशेखर गुरव यांनी ऑडिट दरम्यान हा प्रकार कंपनीच्या निदर्शनास आणून न देता खोटा ऑडिट अहवाल सादर करून अपहार करणाऱ्या दोघांना मदत केली आणि कंपनीचे फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कंपनीचे कर्मचारी गोरक्षनाथ पोपट डोंगरे (वय-३८) रा. नाशिक यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी १८ रोजी सायंकाळी ७.३० वाजता संशयित आरोपी प्रवीण देविदास गुरव, दीपक भिकन पवार दोन्ही रा. पाटणादेवी रोड, आदित्य नगर, चाळीसगाव आणि त्यांना मदत करणारा ऑडिटर चंद्रशेखर एकनाथ गुरव रा. गुजरात पेट्रोल पंपाजवळ, निवृत्ती नगर, जळगाव अशा तिघां विरोधात कंपनीचा अपहर केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीसांनी तिघांना अटक केली आहे. या घटनेचा पूर्ण तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड हे करीत आहे.
हेही वाचा :