जळगाव

जळगाव : मुक्ताईनगर रावेर तालुक्याला वादळाचा तडाखा; केळीची बाग भुईसपाट

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – खरीप हंगामाला सुरुवात होण्याआधीच आलेल्या वादळी वाऱ्यामुळे रावेर व मुक्ताईनगर या भागातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले आहे. या भागात शनिवार (दि.२५) रोजी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग पूर्णपणे भुईसपाट झाली आहे. तहसीलदार कृषी विभाग नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत आहेत.

रावेर तालुक्याला वादळाचा चांगलाच तडाखा बसला आहे. मध्य प्रदेश महाराष्ट्रा सिमेवरील हजारो हेक्टर वरील केळीची बाग भुईसपाट झाली आहे. अटवडा, अजनाड, दोधे, नेहते या पट्यात वादळाचा चांगलाच तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी विद्युत खांब देखील  कोसळून  पडल्याने गावांचा विजपुरवठा खंडीत झाला आहे. रावेर तहसीलदार बंडू कापसे नुकसानग्रस्त भागाची माहिती घेत आहेत. तर मुक्ताईनगर भागातही शनिवार (दि.२५) रोजी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतातील केळी पिकांचे मोठे घड तुटून पडले आहेत. याचबरोबर मुक्ताईनगर राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी असलेल्या हॉटेलवरील पत्र ही उडून गेलेले आहेत.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT